Bhosari

चाकणमध्ये चोरुन घेतलेल्या विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू; एकावर गुन्हा दाखल

By PCB Author

June 21, 2019

चाकण, दि. २१ (पीसीबी) – एकाने आकडा टाकून वीज चोरी केली. तसेच चोरी केलेल्या विजेच्या वायरी तशाच उघड्या ठेवल्याने शेतात चरणाऱ्या दोन म्हशींना त्याचा जोरदार धक्का बसल्याने मृत्यू झाला. ही घटना २९ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास खेड तालुक्यातील वाघु गावात घडली.

याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल हरिभाऊ ढेकणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवराम रघु साबळे (रा. वाघु, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम रघु साबळे यांची भामा आसखेड प्रकल्पात जमीन आहे. त्यांच्या जमिनीत असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर त्यांनी आकडा टाकून वीज चोरी केली होती. तसेच विजेच्या वायरी तशाच उघड्यावर ठेवल्या. यावेळी शेतात चरणाऱ्या दोन म्हशींचा या विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.