चाकणमध्ये कंपनीचे पत्रे उचकटून ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
552

चाकण, दि. १९ (पीसीबी) – बंद कंपनीचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील एकूण ४ लाख ११ हजार ७१२ रुपये किमतीचे वेल्डिंग मशीनच्या केबल, कनेक्टर आणि लग्ज असा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. १८) सकाळी आठच्या सुमारास कुरुळी येथील प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीतून उघडकीस आली.

याप्रकरणी तुषार श्रीराम वाडेकर (वय ३५, रा. वारजे माळवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार यांची चाकण जवळील कुरुळी येथे प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. ही कंपनी आहे. रविवारी रात्री कंपनी बंद होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पत्र्याचे नट-बोल्ट खोलून पत्रा वाकवला. त्यावाटे कंपनीत प्रवेश करून कंपनीत असलेले ४७ वेल्डिंग मशीनच्या केबल, केनेक्टर व लग्ज असा एकूण ४ लाख ११ हजार ७१२ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चाकण पोलीस तपास करत आहेत.