चाकणमध्ये ओला कारचालकाला डिक्कीत कोंबून कार पळवली

0
436

चाकण, दि. २३ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी चाकण येथे जाण्यासाठी ओला कार बुक केली. त्यानंतर चाकण येथे पोहचताच कारचालकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन कारच्या डिक्कीत बंद केले आणि कार पळवली. मात्र वेळेच प्रसंगावदान दाखवून चालत्या कारच्या डिक्कीतून उडी घेतल्याने कार चालकाचे प्राण वाचले. ही थरारक घटना गुरुवार (दि.२०) रात्री अकरा ते शुक्रवार (दि.२१) रात्री सव्वादोनच्या दरम्यान के.के.मॉल चौक कात्रज ते बिरदवली आंबेठाण रोड चाकण येथे घडली.

विशाल हनुमंतराव काळे (वय २७, रा. सोपानराव भोईर उड्डाणपुलाजवळ, दळवीनगर, चिंचवड) असे जखमी ओला कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विशाल हे कारचालक आहेत. त्यांनी त्यांची ह्युंडाई अक्सेंट कार (क्र.एमएच/४७/एन/२१४५) ही ओला कंपनीत लावली आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी ओला अॅपवरुन त्यांची कार चाकण येथे जाण्यासाठी बुक केली. चाकण येथे पोहचताच आरोपींनी विशाल याला लोखंडी रॉडने डोक्यात, पायावर आणि हातावर मारहाण केली. तसेच विशाल यांना त्याच गाडीच्या डीक्कत बंद केले. मात्र विशालने प्रसंगावदान दाखवत कारचा वेग कमी होताच डीक्कीचा दरवाजा खोलून बाहेर उडी घेत आपली सुटका केली. तर चोरटे कार, मोबाईल आणि रोख असा एकूण ४ लाख १२ हजारांच्या ऐवजासह पसार झाले. चाकण पोलीस तपास करत आहेत.