Pune

चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जमावबंदीचे कलम लागू

By PCB Author

July 30, 2018

चाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने चाकण परिसरात आज (सोमवार) आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी अनेक एसटी गाड्यांसह पीएमपीच्या बसेसची जाळपोळ करीत पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तरीही हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे.

दरम्यान, आंदोलकांनी आळंदी, खेड, चाकण, हिंजवडी येथे बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे हिंजवडी वगळता सर्वत्र कडकडीत बंद असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, चाकण येथे काही आंदोलकांनी हिंसक होत २५ ते ३० बसेसची जाळपोळ केली आहे.