Bhosari

चाकणमधील हॉटेलसमोर एक महिन्याच्या चिमुकलीला टाकून महिला पसार

By PCB Author

December 27, 2018

चाकण, दि. २७ (पीसीबी) – एका अज्ञात महिला अंदाजे एक ते दोन महिन्यांच्या चिमुकलीला चाकण येथील एअर लिकीट चौकातील गुप्ता हॉटेल समोर टाकून पसार झाली. ही घटना बुधवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी हॉटेस व्यावसायिक शंकर नानजी गुप्ता यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी फिर्यादी शंकर गुप्ता हे त्यांचे एअर लिकीट चौकातील गुप्ता हॉटेल उघडण्यास गेले होते. यावेळी त्यांच्या हॉटेलसमोर एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये चादरीत गुंडालेली अंदाजे एक ते दोन महिन्यांची चिमुकली आढळून आली. यावर गुप्ता यांनी तातडीने याबाबत चाकण पोलिसांना कळवले. चाकण पोलिसांनी तातडीने धाव घेऊन चिमुकलीला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.