Notifications

चाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण  

By PCB Author

October 23, 2018

चाकण, दि. २३ (पीसीबी) – कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट जबरदस्तीने मिळवण्यासाठी सहा जणांच्या टोळक्यांने भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह व्यावसायिक, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी तीनच्या सुमारास चाकण येथील सिस्का एलईडी कंपनीत घडली.