चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या गुन्ह्यात ५ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

0
760

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – ‘पॉस्को’च्या सुधारीत कायद्यानुसार चाइल्ड पॉर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर, संबंधित व्हिडिओ पाहणे, संग्रही ठेवल्यास आणि वितरण यासंबंधीच्या गुन्ह्यात दंड आणि किमान ५ वर्षे तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असून, दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.  

सध्याच्या कायद्यात या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड किंवा दोन्हींची तरतूद आहे. आता कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करून या गुन्ह्यांत पहिल्यांदा दोषी आढळल्यास किमान ३  वर्षे आणि कमाल ५ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. एखादी व्यक्ती या गु्न्ह्यात दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास त्याला किमान ५ वर्षे आणि कमाल ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओ, फोटो व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर त्याबाबतची माहिती लपवून ठेवल्याचे उघड झाल्यास कठोर दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. या सुधारणांना कायदा मंत्रालयाची मान्यता मिळायची आहे.  पुढील आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा प्रस्ताव  मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.