चांद्रयान- २ ने पाठवला चंद्राचा सुंदर ३डी फोटो

0
493

नवी दिल्ली,दि.१४ (पीसीबी)- इस्त्रोने पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागाचा थ्रीडी व्ह्यू फोटो जाहीर केला आहे. इस्त्रोने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो ‘चांद्रयान-२’च्या टेर्रेन मॅपिंग कॅमेराने  लिंडबर्ग क्रेटरडवळ काढण्यात आला आहे.

काहीच दिवसांपूर्वी इस्त्रोने  चांद्रयान-२ ही मोहीम राबवली होती. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी इस्त्रोने केलेल्या कामगिरीचे कौतुक संपूर्ण जगाने केले होते. भारताच्या या चांद्रयान -२ मोहीमेतील ऑर्बिटर हा सातत्याने चंद्राचे फोटो पाठवत आहे . चांद्रयान-२मधील ऑर्बिटरने आता चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर असा फोटो पाठवला आहे.

चंद्राचा ३डी फोटो पाहून सोशल मीडियावर ही इस्त्रोची ही मोठी कामगिरी असल्याचं बोललं जात आहे.