चांगले फॅमिली ट्रीपचे पॅकेज देतो सांगून निगडीतील तरुणाची २५ हजारांची फसवणूक

0
606

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – फिरायला जाण्यासाठी फॅमिली ट्रीपचे चांगले पॅकजे देतो असे सांगून एका तरुणाची २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक जानेवारी २०१८ ते आज पर्यंत फोन आणि ई-मेल द्वारे करण्यात आली.

अभिजीत कुलकर्णी (वय ३६, रा. प्राधीकरण, निगडी) असे फसवणूक झालेल्या तरणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दोन इसमांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात फसवणूकिचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांना दोन आरोपींनी फोन व ई-मेल द्वारे वेळोवेळी संपर्क साधून तुम्हाला फॅमिली ट्रीपसाठी चांगले पॅकेज देतो असे सांगून त्यांच्याकडून एकूण ९२ हजार रुपये घेतले होते. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी कुलकर्णी यांना कुठल्याही प्रकारचे फॅमिली ट्रीपसाठी पॅकेज दिेले नाही. यावर कुलकर्णी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपींनी त्यांना ६७ हजार रुपयेच परत केले.  मात्र उरवरीत २५ हजार रुपये न देता आरोपींनी कुलकर्णी यांची तब्बल २५ हजार रुपयांची फसवणूक केली. यामुळे कुलकर्णी यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस.व्ही.अवताडे तपास करत आहेत.