Pimpri

चहाची टपरी फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज केला लंपास

By PCB Author

July 04, 2021

आकुर्डी, दि. ४ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी आकुर्डी स्टेशन चौकातील चहाची टपरी फोडून 18 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 3) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सैतानसिंग वसंतसिंग सिसोदिया (वय 34, रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिसोदिया यांची आकुर्डी स्टेशन चौकात चहाची टपरी आहे. शुक्रवारी (दि. 2) दुपारी चार वाजता फिर्यादी यांनी त्यांची टपरी कुलूप लावून बंद केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी टपरी उचकटून नऊ हजार चारशे रुपये किमतीचा माल आणि नऊ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 18 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.