चऱ्होली मधील लॉंग आईसलँड सोसायटीमध्ये कोविड रुग्णांसाठी आयसोलेश वॉर्ड

0
573

चऱ्होली, दि. ९ (पीसीबी) – चऱ्होली येथील प्राईड वर्ल्ड सिटी मधील लॉंग आईसलँड सोसायटीमधे कोरोनाने बाधितांसाठी किंवा व ज्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असतील त्यांना उपचारासाठी सोसायटीच्या क्लबहाऊसमधेच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर नितीन अप्पा काळजे, चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सोसायटीचे चेअरमन अतुलशिंग राठोड, सोसायटीचे सेक्रेटरी कृष्णा त्रिपाठी तसेच शासकीय पुनःनियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्य सचिव माननीय दिपक पाटील तसेच सेंटरमध्ये उपचार करणारे डॉक्टर अजित साठे व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

ह्या लाँग आईसलँड सोसायटीमध्ये सद्या 10 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे , त्यातील 2 बेड ऑक्सिजन युक्त असणार आहेत व इतर 6 बेड हे साधे असणार आहेत, सोसायटीमधील ह्या आयोसोलेशन वॉर्ड मध्ये ऍडमिट होणाऱ्या रुग्णावर उपचार व देखभाल डॉ.अजित साठे करणार आहेत.
सोसायटीमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये खेळती हवा, टॉयलेट बाथरूमची सोय आहे, तसेच फॅन एसी व इतर सुविधा उपलब्द करून दिलेल्या आहेत,सद्याच्या कोरोनाच्या वाढत्या महामारीत सोसायटीने हे चालू केलेले आयसोलेशन सेंटर सोसायटी धारकांच्या साठी खूप महत्वाची मदत आहे.