चऱ्होलीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

0
489

चऱ्होली, दि. ११ (पीसीबी) – दोन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.५ जून) रात्री नऊच्या सुमारास चऱ्होली येथे घडला.

दीपक कडू ढिवरे (वय २३, रा. हनुमानवाडी केळगाव, ता. खेड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास दीपक त्याच्या (एमएच/२२/एबी/८४६७) या क्रमांकाच्या बजाज डिस्कव्हर या दुचाकीवरून चाकण-आळंदी रोडने जात होता. चऱ्होली येथे येताच त्याचा त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो समोरील दुचाकीला (क्र.एमएच/१४/एके/१७०३) जाऊ धडकला. अपघातात दीपकचा मृत्यू झाला तर समोरच्या दुचाकीवरील चालक ज्ञानेश्वर वामनराव टोंगराज (वय २४) हा किरकोळ जखमी झाला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.