Bhosari

चऱ्होलीतील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सव्वा लाखांची चोरी

By PCB Author

January 10, 2019

भोसरी, दि. १० (पीसीबी) – इलेक्ट्रॉनिक्स वस्तु विक्रीचे दुकान रात्रीच्या सुमारास कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत त्यातील टिव्ही, मोबाईल आणि हेडफोन असा एकूण १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.८) रात्री दहा ते बुधवारी (दि.९) सकाळी दहाच्या दरम्यान चऱ्होली आझादनगर येथील सुखकर्ता इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात घडली.

याप्रकरणी प्रितेश पोपट शिवले (वय २९, रा. आझादनगर, तनिश ऑर्चिडजवळ, सर्वे नं.१६२, चऱ्होली रोड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितेश शिवले यांचे चऱ्होली आझादनगर येथे सुखकर्ता इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकानाला कुलुप लावून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत त्यातील टिव्ही, मोबाईल आणि हेडफोन असा एकूण १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. दिघी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.