चड्डीवाल्यांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

0
634

सोलापूर, दि. २१ (पीसीबी) – ज्या चड्डीवरुन तुम्ही बोलत आहात, त्याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, हे विसरु नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

आज (रविवार) सोलापुरातील कुर्डूवाडीत झालेल्या भाजपच्या सभेत मुख्यमंत्री  बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी ‘चड्डी’वरुन शरद पवारांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांना ‘चड्डी’वरुनच प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की,  याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात. २३ मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल की, कोणाची चड्डी उतरते.

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी अकलूजमध्ये झालेल्या सभेत  मोहिते पाटलांना म्हणाले होते की,  भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?  पवारांच्या वक्तव्याचा   फडणवीसांनी खरपूस  समाचार घेतला.