Banner News

चक्रीवादळाचा मावळ, मुळशीत मोठा फटका पुणे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

By PCB Author

June 03, 2020

पुणे, दि. ३ (पीसीबी) – निसर्ग चक्री वादळाने महाराष्ट्राची कोकण किनामरपट्टी बरोबरच पुणे, मुंबईतही मोठे नुकसान केले आहे. चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. वादळामुळं हवेली तालुक्यात एकाचा तर खेड तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुण्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, शिरूर, दौंड या ठिकाणी अजूनही मध्यम स्वरूपाचा वारा व पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शाळांचे पत्रे, घराचे छप्पर, झाड कोसळणे, विजेचे खांब पडणे आदी प्रकारचे नुकसान दिसून आले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जनजीवन सुरळीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळली

चक्रीवादळामुळं परिस्थितीमुळे पुणे शहराच्या विविध भागात काल रात्रीपासून आज सायंकाळी पाच पर्यंत झाड पडण्याच्या 60 च्या आसपास घटना तर 9 ठिकाणी पाणी साठल्याच्या अग्निशमन दलाकडे नोंदी आल्या आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. पुण्यामध्ये रात्री बारा वाजल्यापासून ते आतापर्यंत झाडे पडण्याच्या संदर्भातले जवळपास 40 फोन काॅल आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

चक्री वादळाचा फटका पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला

अलिबाग-उरण मार्गे भूगर्भावर प्रवेश केलेल्या चक्रीवादळाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला ही लक्ष केलं. पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी झाडं कोसळल्याचं चित्र दिसून आलं. ती झाडं रस्त्यावरून हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. अनेक ठिकाणी मार्गावर कोसळलेले वृक्ष कर्मचाऱ्यांनी हटवले आहेत.

विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर आलं. तर मुंबईतील काळाचौकी परिसरात झाड उन्मळून पडलं, यात चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील कानगार नगर वसाहतीत एक विशाल पिंपळाचं झाड बुधवारी दुपारी उन्मळून पडलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईला निसर्ग या चक्रीवादळानं थेट तडाखा दिला नसला जीवितहानी झाली नसली तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी उन्मळून पडलेल्या वृक्षांमुळे मुंबईला त्याची झळ मात्र नक्कीच बसली. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसाठी पुढील दोन दिवस धोक्याचे असतील असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दोन दिवस लोकांनी बाहेर पडू नये, त्यातल्या त्यात समुद्रकिनारी तर आजिबात येऊ नये, असं महापौरांनी म्हटलं आहे. भिवंडीत वादळी वाऱ्याने यंत्रमाग कारखान्याचे पत्रे उडाले

भिवंडी शहरात रात्रीपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरातील हंडी कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखान्याचे पत्रे उडून गेले. तसेच भिंत देखील कोसळली. त्यामुळे कारखान्यात काम करत असलेले दोन ते तीन कामगार जखमी झाले. याशिवाय भिवंडी शहरात तसेच ग्रामीण भागात चार ते पाच ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या चक्रिवादळाचा वेग मोठ्याप्रमाणात नसला तरी एवढं नुकसान मात्र नक्की झालंय. वीज वितरण कंपनीने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित केला होता.

मुरुड व श्रीवर्धनला चक्रीवादळाचा मोठा फटका

रायगडमधील मुरुड, श्रीवर्धन भागातील किनारपट्टी आणि आतल्या भागात वेगाने वारे वाहत आहे. आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र दिवसभर वारा आणि पावसामुळं झाडं मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडली आहेत. शिवाय विद्युत जोडणीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजेचा पुरवठा खंडित झाला आहे.

मुरुड व श्रीवर्धन भागात मोबाईल यंत्रणा विस्कळीत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रोहामधील औद्योगिक वसाहतीच्या सर्व कंपन्या सुरक्षित असून सोलवे कंपनीची भिंत पडली आहे. प्रशासनाकडून मदतकार्य तातडीने सुरू केले आहे. जनजीवन आज उशिरापर्यंत सुरळीत होऊन जाईल, असं जिल्हा प्रशासनाकडून