चक्क १२० वेळा वापरता येते ‘हे’ नॅपकिन!

0
332

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) –   महिलांना मासिक पाळीच्या काळात वापरावे लागणारे सॅनिटरी नॅपकिन हे वापरायला सोयीचे असले तरी त्याच्या किंमतीमुळे महिलांसाठी तापदायकच असते. म्हणूनच आयआयटी दिल्लीच्या मदतीनं एका स्टार्टअपने बनवलेल्या नॅपकीनची चर्चा आहे. हे नॅपकीन चक्क १२० वेळा वापरले जाऊ शकते. हे केळ्याच्या तंतूपासून बनवण्यात आले आहे.

तब्बल दोन वर्ष वापरता येणारं हे नॅपकिन आयआयटी दिल्लीच्या प्राध्यापकांच्या मदतीने ‘सॅनफे’ने तयार केले आहे. दोन नॅपकिनची किंमत १९९ रुपये आहे. या टीमने या संशोधनासाठी पेटंटही दाखल केले आहे.

या स्टार्टअपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या अर्चित अग्रवालने सांगितले, ‘बहुतांश सॅनिटरी नॅपकिन सिंथेटिक मटेरिअल आणि प्लास्टिकपासून बनलेले असतात. त्यांचे विघटन होण्यासाठी ५० ते ६० वर्षं लागतात. या नॅपकिन्सपासून पर्यावरणाला धोका असतो. ती जाळल्यावर डायऑस्किनच्या रुपात कार्सिनोजेनिक धूर उत्सर्जित होतो. परिणामी वायूप्रदूषणाचा धोका असतो.’