चक्क मामानेच केला भाचीचा विनयभंग

0
225

वाकड, दि. 19 (पीसीबी) : दुकानातून घरी जात असलेल्या अल्पवयीन भाचीला रस्त्यात अडवून तिच्यशी गैरवर्तन करत मावस मामाने तिचा विनयभंग केला. याबाबत मावस मामला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री पावणे दहा वाजता सुदर्शन  नगर,वाकड येथे घडली.

विजय काळुराम शिर्के (रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पीडित मुलगी दुकानातून घरी जात होती. रस्त्यात एका ठिकाणी आरोपी रिक्षात बसला होता. मुलगी येताना दिसताच त्याने तिचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. ‘तू छान दिसतेस. मला आवडतेस’ म्हणत तिचा विनयभंग केला. घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काही बोललीस तर मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.