”चक्क देवच गेले चोरीला” मुंबईतील माहीम येथील घटना ..

0
315

मुंबई दि .१२ (पीसीबी) – मुंबईतील माहीमचं काशी विश्वेश्वर मंदिर म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते . मुंबई मधल्या माहीम मध्ये असलेल्या या काशी विश्वेश्वर मंदिराला आज २३८ वर्ष पूर्ण झाली आहेत.मात्र सध्या काशी विश्वेश्वराच्या भक्तांमध्ये संताप आहे. कारण या मंदिरातल्या देवांच्या मूर्तीं, विश्वस्तांनी अपहार केल्याचा आरोप भक्तांकडून केला गेला आहे .याविरोधात पोलिसात व धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.

माहीम येथे ‘दादोबा जगन्नाथ रिलीजीअस ट्रस्ट’ च्या माध्यमातून संचलित असलेलं हे मंदिर १७८३ साली नारायण दाजी मंत्री यांनी स्थापन केलं होतं. मंदिरात काशी विश्वेश्वराचं शिवलिंग , माता पार्वती , माता शितलादेवी , क्रूरम देवता (कासव) आणि नंदी या पाच काळ्या पाषाणातल्या मूर्ती तेव्हा स्थापिलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर पुरातन असल्यामुळे या मंदिराला “राज्य संरक्षित स्मारकाचा” दर्जा देण्यात आला आहे.

पण सध्या काशी विश्वेश्वराच्या भक्तांमध्ये संताप आहे , कारण या मंदिरातल्या देवांच्या मूर्तींचा विश्वस्तांनी अपहार केल्याचा आरोप भक्तांकडून केला जातोय . २०१३ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता . तेव्हा जुन्या मूर्ती बदलून नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलीय . या जुन्या मूर्ती २३८ वर्ष जुन्या आहेत . त्यामुळे या मूर्तीं पुरातन असून त्यांना ऐत्याहासिक आणि धार्मिक महत्व आहे . या मूर्ती बदलल्या पण जुन्या मूर्ती गायब केल्या म्हणत याविरोधात प्रसाद ठाकूर आणि काही भक्तांनी पोलिसात तक्रार नोंदवली व धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे.