चंद्रकांत पाटील यांची दुटप्पी भूमिका

0
371

– लाचखोर, खंडणीखोरांसाठी पोलिसांकडे तरफदारी आणि लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या नगरसेविकेकडे पाठ

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – खोट्या पोलिस केसमध्ये दबाव आल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येऊन गजानन चिंचवडे यांचे निधन झाले. तत्पूर्वी माजी उपमहापौर केशव घोळवे यांना खंडणी प्रकऱणात मध्यरात्री अटक करण्यात आली, तर स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाचखोरी प्रकऱणात आठवडाभर जेलची हवा खावी लागली. या सर्व प्रकऱणांचा हवाला देत, पोलिस एका नेत्याच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजपाच्याच जेष्ठ नगरसेविका आशा शेंडगे यांनी गणेशोत्सव काळात रस्ते खोदाईला विरोधासाठी आयुक्त कक्षासमोर आंदोलन केले म्हणून त्यांच्यासह नऊ गृहिणींना अटक केली होती तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी साधी विचारपूससुध्दा केली नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल भाजपामध्येच नाराजीचा सूर आहे.

भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आशा शेंडगे यांनी कासारवाडी येथील रस्ते खोदाई गणेशोत्सव काळात नको म्हणून महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कक्षा समोर आंदोलन केले होते. त्यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या नामफलकावर काळी शाई फेकली होती. त्यावेळी शेंडगे यांच्यासह नऊ महिलांना सणासुदिच्या दिवशी येरवडा जेलची हवा खावी लागली. आयुक्त राजेश पाटील यांच्या कारवाईवर समाजमाध्यमात आणि लोकांमध्ये नाराजी होती. कारण लोकांच्या प्रश्नावर प्रशासनाकडे दाद मागणाऱ्या नगरसेविकेवर अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कठोर कारवाईबद्दल राजकिय गोटातूनसुध्दा नाराजीचा सूर होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी महापालिका आयुक्तांना थेट जाब विचारणे अपेक्षित होते, पण त्यांनी ते टाळले. आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेला लोकांच्या प्रश्नावर प्रशासन जेल दाखवत असल्याचे पाटील यांना वाईट वाटले नाही. दुसरीकडे चिंचवडे यांच्या घरगुती जमिनीच्या वादात अक वॉरंट निघाले तसेच लाचखोरीत स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडेग आणि खंडणीखोरीत केशव घोळवे यांच्यावर कारवाई केली म्हणून चंदकांत पाटील धावत आले.

कायदा पाळून आंदोलन कऱणाऱ्या आपल्याच नगरसेविकेला पाठिंबा द्यायला पाटील विसरले, मात्र लाचखोरी, खंडणीखोरीच्या गुन्ह्यात रंगेहाथ सापडलेल्या आपल्या नगरसवेकांवरच्या कारवाईला विरोध दाखविण्यासाठी पाटील हे थेट पोलिस आयुक्त यांना भेटायला आले. कायदा पाळणाऱ्यांपेक्षा कायद्याचा खून कऱणाऱ्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. लांडगे, घोळवे, चिंचवडे यांच्या प्रकरणात अर्थकारण असल्याने पाटील धावत आले, पण शेंडगे यांच्या प्रकरणात कुठलाही अर्थ नसल्याने पाटील यांनी रस दाखविला नाही, असेही सांगितले जाते.