Maharashtra

चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? – विजय वडेट्टीवार

By PCB Author

June 28, 2019

मुंबई, दि, २८ (पीसीबी) – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात १५ सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता असून १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाजही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला होता. यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारयांनी पाटील यांच्यावर टीका करत, चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत की मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवडणूक आयोगात डेप्युटेशनवर पाठवलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे नेते आकडे जाहीर करतात आणि चंद्रकांत पाटील तारखा जाहीर करत आहेत त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी ‘यापूर्वी अबकी बार ३०० के पार’ अशी घोषणा दिली होती. तेव्हा ३३० जागा जिंकल्या. आता राज्यातील नेते अबकी बार २२० के पार अशी घोषणा दिली जातेय. ही माहिती यांना मिळते कशी, निवडणूक आयोग यांना तारखा सांगते का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.