Maharashtra

चंद्रकांत पाटलांकडून ‘या’ पत्रकाराला मंत्रिपदाची ऑफर  

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – ‘नायक’ चित्रपटातील डॉयलॉगप्रमाणे पत्रकाराच्या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.  मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री करतो. तुम्ही मंत्रीमंडळात येऊन उद्या किती पाऊस पडू शकतो हे सांगा?, असे आव्हान देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही ९’चे पत्रकार ऋषी देसाई यांना मंत्रिपदाची ऑफर दिली.  

राज्य सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष  केल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावरुन चंद्रकांत पाटील यांना  विचारले असता त्यांनी सारवासारव  करून बाजू पलटण्याचा प्रयत्न केला.

पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडले असे वाटत नाही का?, असा सवाल ऋषी देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना केला. यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी चंद्रकांत पाटलांनी पत्रकार ऋषी देसाई यांना मंत्रिपद देण्याची ऑफर दिली.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या ऑफर नंतर हा ‘नायक’ नावाचा चित्रपट नाही. पंचगंगेचे पाणी वाढत असताना लोकांना इशारा न दिल्याने कोल्हापूर, सांगलीतील लोकांना पूराचा फटका बसला आहे,  असे ऋषी देसाई म्हणाले.