चंद्रकांत दादा म्हणतात…‘या’ तारखांना होणार विधानसभा निवडणूक?

0
627

मुंबई, दि, २२ (पीसीबी) – सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज बैठक घेतली. या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला.

चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “९ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यामुळे यंदा १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल असे म्हटले. लोकसभा निवडणूक यशाच्या पार्श्वभूमीवर आणि दुष्काळ आढावा घेणारी आणि विधानसभा निवडणूक योजना करण्यासाठी आज भाजपची बैठक झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले