चंदननगरमध्ये पतीने पत्नीवर गोळीबार करुन केली हत्या

0
792

पुणे, दि. २१ (पीसीबी) – चंदननगरमधील आनंद पार्क येथे पतीने पत्नीवर गोळीबार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.

एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) असे या महिलेचे नाव असून  या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पार्क येथे राहणाऱ्या एकता या खानावळ चालवायच्या. बुधवारी सकाळी त्यांचे पती ब्रिजेश यांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिस तपास करत आहे.