घोरावाडी येथे नोकरीच्या शोधात निघालेल्या विवाहितेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

0
496

तळेगाव, दि. ९ (पीसीबी) – नोकरीच्या शोधात निघालेल्या एका विवाहित महिलेचा रेल्वेच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव-घोरावाडी रेल्वेमार्गा दरम्यान घडली.

वृषाली विवेक घाटकर (वय २६, रा. चिखली प्राधिकरण) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली यांना नोकरीची गरज असल्या कारणाने त्या सोमवारी नोकरीच्या शोधात घरातून बाहेर पडल्या होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव-घोरावडी रेल्वेमार्गा दरम्यान त्यांना रेल्वेची धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हि आत्महत्या आहे कि अपघात हे अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.