घर बांधण्यासाठी भावाकडून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
233

दापोडी, दि. 27 (पीसीबी): घर बांधण्यासाठी भावाकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दापोडी येथे घडली. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयराज जेविअर मुदलीयार (वय 48, रा. शंकर काची चाळ, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने शनिवारी (दि. 26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2005 ते 27 मार्च 2021 या कालावधीत दापोडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती विजयराज हा वारंवार फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत असे. तुझ्या माहेरच्यांनी मला काही दिले नाही. एकदा फक्त थ्री व्हीलरला पैसे दिले आहेत. आता दापोडी येथे घर बांधण्यासाठी भावाकडून दोन लाख रुपये आण, असे म्हणत वेळोवेळी फिर्यादी यांचा छळ केला. त्यांना उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.