घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
313

वाकड, दि. १६ (पीसीबी) – घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. याबाबत पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती मोजेस मनोहर पवार (वय 35), सासू अलका मनोहर पवार (वय 60, दोघे रा. नढेनगर,काळेवाडी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती मोजेस याने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच माहेरच्यांशी सतत फोनवर बोलते म्हणून शिवीगाळ केली. नवीन घर घ्यायचे आहे. तू माहेरहून पैसे आण अशी पती आणि सासूने विवाहीतेकडे मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला. त्यावरून पती आणि सासूने मारहाण करून वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. विवाहिता सासरी नांदायला गेल्यावर स्वतःचे घर नसतानाही ‘आपले घर आहे’ असे सांगून विवाहितेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.