Desh

घर खरेदी स्वस्त; निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्के

By PCB Author

February 24, 2019

 नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – केंद्र सरकारने निर्माणाधीन घरांवरील जीएसटीत १२ वरून ५ टक्के कपात केली आहे. तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील ८ वरून एका टक्क्यावर आणला आहे. आज ( रविवारी) जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती  केंद्रीय  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  दिली.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. गृहखरेदीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान,  बुधवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली होती. त्याचवेळी गृहखरेदीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, काही राज्यांनी या विषयावर आणखी विचारविनिमय करायचा असल्याचे सांगत वेळ मागितल्याने हा प्रस्ताव  रखडला  होता.