Pimpri

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भरदिवसा लाखांची घरफोडी

By PCB Author

September 13, 2021

पिंपरी, दि.१३ (पीसीबी) : सुसगावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी दहा ते सायंकाळी सव्वासात या कालावधीत ठकसेन नगर, सुसगाव येथे घडली.

संतोष बाबासाहेब सानप (वय 28, रा. ठकसेन नगर, सुसगाव) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सानप शनिवारी सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

कपाटातून 60 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 63 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास सानप घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.