घरातील इलेक्ट्रिक मीटर चोरीला

0
268

कासारवाडी, दि. १६ (पीसीबी) – चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात चोरटे काय चोरून नेतील याचा काही नेम नाही. वाहने, मोबईल, पर्स, जनावरे यासोबत आता घरातील इलेक्ट्रिक मीटर देखील चोरून नेल्याचा प्रकार कासारवाडी येथे सामोर आला आहे. नामदेव माळी चाळ, कासारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी एका घरातील इलेक्ट्रिक मीटर चोरून नेल्याचा प्रकार 10 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे.

दीप्ती प्रसाद जोशी (वय 37, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 15) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई नामदेव माळी चाळ, कासारवाडी येथे राहतात. त्यांचे घर मार्च 2020 पासून 10 ऑक्टोबर 2020 या कालावधीत बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या आईच्या घरातील 100 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक मीटर चोरून नेला. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.