घरातच गांजाची विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
200

पुणे, दि.११ (पीसीबी) : सासवड शहर परिसरात चक्क घरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला सासवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत उर्फ नाना गणेश पासलकर, वय २५, रा. खंडोबानगर, सासवड, ता. पुरंदर, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . त्याच्याकडून पोलिसांनी ६३ हजार ५०० रुपयांचा सव्वा चार किलो गांजा व एक चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०५) एका गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, सासवड शहरातील खंडोबानगर झोपडपटटी मध्ये प्रशांत पासलकर हा घरामध्ये गांजाची विक्री करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, पोलीस अंमलदार गणेश पोटे, निलेश जाधव, जब्बार सय्यद, लियाकत अली मुजावर, लियाकअली मुजावर यांचे एक पथक तयार केले. व तालुका कार्यकारी दंडाधिकारी दत्तात्रय गवारी यांच्यासह जावुन खात्री करून छापा टाकला. छापा टाकला असता त्या ठिकाणीप्रशांत पासलकर हा घरामध्ये त्याच्या समोर एक स्टीलचा पत्र्याचा डब्बा व प्लास्टिक पिशव्या घेवुन बसलेला दिसला.

पोलिसांनी पासलकर याला ताब्यात घेतल्यावर त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता वरीलप्रमाणे सांगितला. तसेच त्याचे जवळ असलेल्या डब्यात गांजा भरलेला मिळुन आला तसेच विक्रीसाठी बाजुला गांजा भरलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या मिळुन आल्या. त्याची झडती घेतली असता गांजा विक्रीतून मिळालेली रोख रक्कम २० हजार ५०० रुपये मिळुन आली. तसेच गांजा आणण्यासाठी वापरत असलेली चारचाकी गाडी मिळुन आली.

दरम्यान, गाडीची तपासणी केली असता ड्रायव्हर शीट च्या बाजूला एक पिवळसर रंगाच्या कॅरीबॅगमध्ये छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा पॅक करून ठेवलेला दिसून आला. सदर गांजा हा सव्वा चार किलो असून एक त्याची किंमत ६३ हजार ५१० रुपये आहे. तसेच आरोपीकडून गांजा आणण्यासाठी वापरत असलेली चारचाकी गाडी व रोख रक्कम २० हजार ५२० रुपये मिळुन आली आहे. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, पोलीस अंमलदार गणेश पोटे, निलेश जाधव, जब्बार सय्यद, सुहास लाटणे, लियाकतअली मुजावर, संजयकुमार दाणे, महिला पोलीस अंमलदार कोमल शेटे यांचे पथकाने केलेली आहे.