Pimpri

घराच्या दरवाजाला भगदाड पडून चोरटयांनी केला घरात प्रवेश आणि तेवढ्यात….

By PCB Author

November 08, 2021

पिंपरी, दि.०८ (पीसीबी) : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एलईडी टीव्ही आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. घराच्या दरवाजाला भगदाड पाडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी साडेबारा वाजता ग्रामीण रुग्णालय, चाकण येथे उघडकीस आली. वसंत नामदेव झगडे (वय 50, रा. शासकीय निवासस्थान, ग्रामीण रुग्णालय, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झगडे हे शुक्रवारी (दि. 5) दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लावून गावी गेले. अज्ञात चोरट्यांनी झगडे यांच्या घराच्या मागील लाकडी दरवाजाला खालील बाजूने भगदाड पाडले. त्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. 17 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही आणि 1200 रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीचा भरलेला सिलेंडर चोरट्यांनी चोरून नेला. फिर्यादी झगडे रविवारी दुपारी गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.