घराच्या छतावरुन पडल्याने इंजिनियर तरुणीचा दुर्देवी मृत्यू

0
773

गोंदिया, दि. २५ (पीसीबी) – घराच्या छतावरुन पडल्याने एका इंजिनियर तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी पाचच्या सुमारास देवरी तालुक्यातील ग्राम सावली येथे घडली. धक्कादायक म्हणजे या तरुणीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा देखील झाला होता.  

दीक्षा देवनाथ बिनझेलकर असे या मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास दीक्षा ही काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली होती. मात्र, तिचा तोल गेल्याने ती छतावरून खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत दीक्षा ही इंजिनियर असून ती नागपूरच्या एक खासगी कंपनीत कार्यरत होती. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील तरुणाशी झाला होता.