Pune Gramin

घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला १९ वर्षांनंतर तळेगाव दाभाडे येथून अटक

By PCB Author

July 10, 2019

तळेगाव, दि. १० (पीसीबी) – राज्यातील पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी १५० हून अधिक घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार संजय नामदेव कांबळे (वय ४८, रा. गांधीनगर, देहुरोड) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल १९ वर्षानंतर अटक केली आहे. तो २००० सालापासून फरार होता.

पोलीस नाईक महेश निंबाळकर यांना शनिवारी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती कि, राज्यातील पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी १५० हून अधिक घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार संजय कांबळे हा तळेगाव दाभाडे परिसरात येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संजय याला अटक केली. त्याचे साथीदार मिलींद पवार, निलेश चौगुले, सुभाष महामुनी, अनंतर सिदाडकर यांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती. कांबळे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याला पुढील कारवाईसाठी समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.