Chinchwad

घरफोडी करून ४० तोळ्यांचे दागिने लंपास

By PCB Author

August 06, 2020

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेल्या फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल ४० तोळ्यांचे दागिने चोरून नेले. ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत साई ग्रेस सोसायटी, लिंक रोड, ईगल हॉटेल शेजारी, चिंचवडगाव येथे घडली.

अक्षय प्रवीण बंब (वय 30, रा. श्रीधरनगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत मावस भाऊ दीपक फुलपगर हे मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्याने आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या मूळ गावी गेले आहेत. त्यानंतर त्यांचा चिंचवडगाव येथील फ्लॅट लॉक लाऊन बंद होता. मध्यंतरीच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे लॅचलॉक तोडून आत प्रवेश केला. फ्लॅटमधील मास्टर बेडचे लॅच तोडून तब्बल ४० तोळ्यांचे दागिने लंपास केले. त्यात सोन्याचा एक हार व कानातील टॉप्स (३५ ग्रॅम), सोन्याचे पेंडल असलेला टॉप्स (५० ग्रॅम), सोन्याचा हार (५५ ग्रॅम), दोन पाटल्या (४९ ग्रॅम), डायमंड असलेली चैन(११.८६ ग्रॅम), सोन्याचे टॉप्स (५७ ग्रॅम), सोन्याची अंगठी (६ ग्रॅम), सोन्याचे ब्रेसलेट(२१ग्रॅम), सोन्याच्या चार बांगड्या (८० ग्रॅम), सोन्याची नाकातील मुरणी(२ ग्रॅम), कानातील टॉप्स जोड (५ ग्रॅम), सोन्याचे कडे (२२ ग्रॅम) तसेच रोख ६२ हजार रुपयेंची रक्कम चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.