घरफोडी करून दुकानातून 16 एअर पिस्टल चोरीला

0
338

चाकण, दि. २९ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 16 एअर पिस्टल आणि 343 छ-याचे राउंड चोरून नेले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोन वाजता चाकण मधील बंदूक घर येथे उघडकीस आली.

उत्तम नाना रूपटक्के (वय 50, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी 28 सप्टेंबर रोजी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रूपटक्के यांचे चाकण मधील एकता नगर येथे बंदूक घर नावाचे दुकान आहे. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 16 एअर पिस्टल आणि 343 नग छ-याचे राउंड असा 64 हजार 120 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच दुकानातून बिलबुक आणि रजिस्टर देखील चोरट्यांनी चोरून नेले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.