घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेले असता; चोरांनी केला धुमाकूळ

0
325

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेलेल्या एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि शेजारच्या व्यक्तीची दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी शिक्रापूर रोड, शेल पिंपळगाव येथे उघडकीस आली. अंबादास हरीभाई गव्हाळे (वय 44, रा. शिक्रापूर रोड, शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लावून भोसरी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते परत घरी आले असता त्यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा, तसेच कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता 20 हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन जोड चांदीच्या पट्ट्या, दोन हजार रुपये किमतीचा एक चांदीचा छल्ला आणि 40 हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघडकीस आले. तसेच फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचे दुचाकी (एम एच 12 / जी वाय 1423) देखील चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.