Maharashtra

घरच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची मनसोक्त फटकेबाजी

By PCB Author

December 04, 2018

नागपूर दि. ४ (पीसीबी) – राजकारणात गुगली टाकून विरोधकांना चकवा देणारे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होम ग्राऊंडवरील क्रिकेटच्या पिचवर  मनसोक्त फटकेबाजी करून आपणही तडाखेबाज  फलंदाज असल्याचे दाखवून दिले.  नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात ‘सीएम चषक’ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना फलंदाजी करण्याचा मोह आवरता आला नाही.   

यावेळी फलंदाजी करताना मुख्यमंत्र्यानी काही चेंडू सहज फटकावले. तर फडणवीस यांनी अचानक एक रिव्हर्स स्वीप लगावून उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. मुख्यमंत्र्यांचा रिव्हर्स स्वीप पाहून टाळ्या वाजवून उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. काही कार्यकर्त्यांच्या चकवणाऱ्या चेंडूवर मुख्यमंत्रीही बीट झाले. तर अखेरच्या चेंडूवर पायचीत झाले.