Maharashtra

घरच्यांनी साथ सोडली, तरी डॉक्टरांनी रुग्णाला स्वतःच्या हातांनी भरवले जेवण

By PCB Author

April 05, 2020

चेन्नई, दि.५ (पीसीबी) – कोरोनाविरुद्धच्या युद्धात सध्या सारं जग एकत्र आले आहे. वैद्यकिय कर्मचारी या लढ्यात दिवसरात्र मेहनत करत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्याचे काम सध्या डॉक्टर आणि परिचारिका करत आहेत. या सगळ्यात एका डॉक्टरांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये डॉक्टर स्वत:च्या हाताने रुग्णाला जेवण भरवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर या फोटो व्हायरल झाल्यानंतर, रुग्णाचे नातेवाईक येऊ शकले नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी या रुग्णाला स्वत:च्या हातांनी जेवण भरवले. हा फोटो पाहून लोकांनी डॉक्टर खरे हिरो आहेत, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

ट्विटरवर हा फोटो अरुण जनार्दनन यांनी शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताना, “जर रुग्णाचे नातेवाईक येऊ शकले नाही तर डॉक्टर (मद्रास मेडिकल मिशनचे ज्येष्ठ नेफ्रोलॉजिस्ट) जॉर्जियन अब्राहम यांनी रुग्णाला स्वत:च्या हातांनी जेवण भरवले”, असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या डॉक्टरांचे कौतुक केले आहे.

As relatives of a patient couldn't come, a doctor (Georgi Abraham, a senior Nephrologist of Madras Medical Mission) is feeding his patient. This is MEDICINE. #AmidstLockdown pic.twitter.com/W7xE4G31fi

— Arun Janardhanan (@arunjei) April 4, 2020