घरच्यांनी खलनायक ठरविले, मात्र पवारसाहेबांनी कुवत ओळखली – धनंजय मुंडे

0
2135

बीड, दि. १६ (पीसीबी) – मला घरच्यांनी खलनायक ठरविले, मात्र, पवार साहेबांनी माझी कुवत ओळखली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नांव न घेता निशाणा साधला.   

तालुक्यातील चिचोंडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुंडे बोलत होते. काही जण वारसा सांगतात मुंडे साहेबांचा आणि नाव लावतात दुसऱ्यांचे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती. या टीकेला त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले.

यावेळी मुंडे पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडेसाहेबांनी माझ्याशी रक्ताचे नाते तोडल्याचे भगवानगडावरून जाहीर केले. नंतर मला पुढे करत खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार साहेबांनी माझी कुवत ओळखली आणि मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले, असे धनंजय मुंडे म्हणाले.