घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही – शरद पवार  

0
1003

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच येत  नसून मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी घेईन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. घटना बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. म्हणून संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही पवार  म्हणाले.

घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावे, असे भारीपचे प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये म्हणाले होते. घटनादुरुस्ती कशी होईल हे पवारांनी न सांगितल्यास केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले हेते, असा त्याचा अर्थ निघेल, असे आंबेडकर म्हणाले होते. यावर पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पवार म्हणाले की, आम्ही आरक्षण देण्याचा  निर्णय घेतला, हे गडकरी विसरले. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना निर्णय राबवला, आरक्षण दिले. लोकांना नोकऱ्या मिळाल्या. पण काही जण न्यायालयात गेले आणि निर्णयाला स्थगिती मिळाली. गडकरी हे उत्तम काम करतात याची मला कल्पना आहे आणि आनंद आहे. मात्र त्यांनी असे काही राजकीय विधान केले, तर ते अशोभनीय आहे, असे पवार म्हणाले.