Pimpri

ग्राहक बनून आलेल्या महिलांनी दुकानातून मोबईल फोन पळवला

By PCB Author

October 19, 2020

दापोडी,दि.१९(पीसीबी) – ग्राहक बनून आलेल्या दोन महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने मिळून दुकानाच्या काउंटरच्या खाली ठेवलेला मोबईल फोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 18) दुपारी दोन वाजता दापोडी येथील माया नोव्हेल्टीज या दुकानात घडली.

जेबा समीर शेख (वय 28, रा. जुनी सांगवी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी महिला आणि एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे दापोडी येथे माया नोव्हेल्टीज हे दुकान आहे. रविवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या दुकानात दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलगी ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी बेन्टेक्सचे मंगळसूत्र घेण्याचा बहाणा केला. फिर्यादी शेख महिलांना मंगळसूत्र दाखवत असताना नजर चुकवून आरोपींनी दुकानाच्या काउंटरच्या खाली ठेवलेला सहा हजारांचा मोबईल फोन चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.