ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थिनींना मोफत एसटी पास; दिवाकर रावतेंची घोषणा   

0
421

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मंजुरी देण्यात आली.