Desh

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश; लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता  

By PCB Author

March 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भारतीय  संघाचा माजी डावखुरा फलंदाज  गौतम गंभीर यांने आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश केला.  लवकरच तो राजकारणात सक्रीय होणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  त्यांने  भाजपमध्ये प्रवेश केल्याने गंभीरला लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  

भाजपकडून  गौतम गंभीरला दिल्लीमधून लोकसभेची उमेदवारी  मिळण्याची शक्यता आहे. गंभीर यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षाचे माजी खासदार आणि सध्याचे आमदार यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपकडून सुरु आहे. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला देखील भाजपकडून हरियाणाच्या रोहतकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी दिल्लीमधून गौतमला  रिंगणात  उतरवण्याची तयारी सुरु आहे. खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते.  गंभीर यांने आम आदमी पक्षावर ट्विटरच्या माध्यमातून नेहमी टीका केली आहे. त्यामुळे गंभीर भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू होती. अखेर गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.