Maharashtra

गो महाविकास आघाडी गो… असे आम्हाला म्हणावे लाणार – रामदास आठवले

By PCB Author

March 13, 2020

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – राज्यसभेसाठी भाजपाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निघता निघता आठवलेंनी महाविकास आघाडीलाही टोला लगावला. “जोपर्यंत करोना देशातून जात नाही तोपर्यंत आम्ही गो करोना गो म्हणत राहणार आहोत. तसेच करोना गो करोना गो असे म्हणताना गो महाविकास आघाडी गो… असे आम्हाला म्हणावे लागणार आहे,” असे आठवले म्हणाले.