गोव्यात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांचा राजीनामा  

0
297

पणजी, दि. १६ (पीसीबी) – गोवा काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते दोघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.