गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा; राज्यपालांना दिले पत्र

0
621

पणजी, दि. १६ (पीसीबी) – मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळल्याने ते सत्ता चालवण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशा मागणीचे पत्र गोव्याचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनी राज्यपालांना आज (शनिवार) दिले आहे.   

गोव्यात भाजप सरकार सत्ता चालवण्यात अपयशी ठरले आहे. काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे  आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी,  असे पत्र काँग्रेसने राज्यपालांना दिले आहे. आम्ही गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलो आहोत आणि हा गोव्यातील जनतेचा कौल आहे. यावर आपण विचार कराल, अशीही विनंती काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  त्यांची प्रकृती वारंवार बिघडत आहे.  अशा परिस्थितीत त्यांनी राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला होता. त्यामुळे  आता काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.