Notifications

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर हेच कायम राहणार – अमित शहा

By PCB Author

September 23, 2018

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी यापुढेही मनोहर पर्रीकर हेच कायम राहतील, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. शहा यांनी रविवारी (दि. २३) ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. गोवा प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा केल्यानंतर राज्याचे नेतृत्व पर्रीकर यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शहा यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करण्यात येतील. तसेच काही मंत्र्यांकडील खाती बदलण्यात येतील, अशी माहितीही शहा यांनी दिली आहे.