गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील शार्पशूटर भरत कुरणेला अटक

0
863

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील शार्पशूटर भरत कुरणे आणि त्याचा साथीदार वासुदेव सूर्यंवंशी ( रा. नालासोपारा, मुंबई ) याला कोल्हापूर एसआयटीने अटक केली आहे. त्याला आज (शनिवारी) दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पानसरे हत्या प्रकरणात आता एकूण संशयितांची संख्या ७ झाली आहे.

कुरणे याला यापूर्वी केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय)  कर्नाटक एसआयटीने अटक केली होती. कुरणे याचा अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत सहभाग असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पानसरे हत्या प्रकरणातील पाचवा संशयित अमोल काळे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी बेंगळुरू कारागृहात झाली आहे. एटीएसला त्याच्याकडून काही धागेदोरे हाती लागले असल्याची शक्यता आहे.