Desh

गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट

By PCB Author

September 02, 2019

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी)  – भारताचा  वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याविरोधात पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी  शमीविरोधात  पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. मात्र,  शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो, असेही कोर्टाने म्हटले आहे.

मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलेआहे. सरेंडरसाठी त्याला कोर्टाने १५ दिवसांची मुदत दिली आहे.  मात्र शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीने  फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केले होते. यामुळे  मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीने फेसबुक पोस्टद्वारे केला होता.