गोलंदाजांनी साकारला मुंबईचा विजय

0
186

चेन्नई, दि.१४ (पीसीबी) – फलंदाजीत अपयश आल्यानंतर गोलंदाजांनी आज आयपीएलच्या नव्या मोसमात मुंबई इंडियन्सचा पहिला विजय साकारला. त्यांनी कोलकता नाईट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला सुर्यकुमार यादवचे (५६) अर्धशतक आणि त्याला मिळालेली रोहित शर्माची साथ याच्या जोरावर कमाल आव्हानापर्यंत मजल मारता आली. त्यांचा डाव २० षटकांत १५२ धावांत आटोपला. त्यानंतर नितीश राणाच्या सलग दुसऱ्या अर्धशतकानंतरही अन्य फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे कोलकताचा डाव विजया जवळ येऊनही ७ बाद १४२ मर्यादित राहिला.

आव्हानाचा पाठलाग करताना नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी कोलकताला झकास सलामी दिली . षटकामागे जवळपास नऊच्या गतीने त्यांनी धावा कुटल्या . पण, त्यानंतर रोहित शर्माच्या कल्पक नेतृत्वाने सामना टप्प्या टप्प्याने मुंबईच्या हातात आला. अखेरच्या षटकांत तो त्यांनी हातात घट्ट पकडून ठेवला. सलामीची जोडी फोडण्यासाठी ९ षटकांतच पाच गोलंदाज वापरणाऱ्या कर्णधार रोहितला राहुल चहरने साथ दिली. त्याने प्रथम शुभमन गिल, नंतर राहुल त्रिपाठी आणि मग कर्णधार इयॉन मॉर्गन, पुढे नितीश राणाचीही विकेट मिळवली . आघाडीचे चारही प्रमुख फलंदाज चहरने गारद केले आणि बिनबाद ७२ वरून चेन्नईचा डाव १६व्या षटकांत ५ बाद १२२ असा अडचणीत आला. त्यानंतर मात्र ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमरा यांच्या अखेरच्या षटकातील भेदक माऱ्याने कोलकात्याच्या विजयाच्या आशाच संपुष्टात आल्या. कोलकताची फलंदाजी अशी काही कोलमडली की राणा (५७) आणि गिल (३३) वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी मजल मारता आली नाही.
पाच गडी बाद करणाऱ्या कोलकता संघाच्या आंद्रे रसेल याने आनंद असा खास शैलीत साजरा केला.

त्यापूर्वी, मुंबईला सलामीच्या जोडीत बदल करूनही चांगली सुरवात मिळाली नाही. क्वीटॉन डी कॉक दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी सुरेख फटेबाजी करताना मुंबईच्या डावाला गती आणली. पण पुन्हा एकदा त्यांनी जुळून आलेली साथ फटकेबाजीच्या मोहात अडकली. सुर्यकुमार यादव (५३) बाद झाला. त्यानंतर मुंबईचा एकही फलंदाज दोन आकड्यात पोचू शकला नाही. त्यामुळे मधल्या षटकापासून त्यांचा डाव संथ झाला. अखेरच्या षटकात तर त्यांना काही करता आले नाहीत.
यातही आंद्रे रसेल याने टाकलेले १८ आणि २० वे षटक नाट्यपूर्ण ठरले. या दोन षटकांत त्याने पाच गडी बाद करून मुंबईच्या डावाला पूर्णविराम दिला. रसेलने केवळ ही दोनच षटके टाकताना १५ धावांत ५ गडी बाद केले. सहावा पर्यायी गोलंदाज म्हणून त्याने आपली जबाबदारी चोख बजावली.

संक्षिप्त धावफलक –
मुंबई इंडियन्स २० षटकांत सर्व बाद १५२ (सुर्यकुमार यादव ५६ (३६ चेंडू, ७ चौकार, २ षटकार), रोहित शर्मा ४३ (३२ चेंडू,३ चौकार, १ षटकार), कृणाल पंड्या १५, हार्दिक पंड्या १५, आंद्रे रसेल ५-१५, पॅट कमिन्स २-२४) वि,वि. कोलकता नाईट रायडर्स २० षटकांत ७ बाग १४२ (नितीश राणा ५७ (४७ चेंडू, ६ चौकार, २ षटकार), शुभमन गिल ३३ (२४), राहुल चहर ४-२७, ट्रेंट बोल्ट २-२७)-